जुन्नरच्या सडे पठारांचा युनेस्को ग्लोबल जीओपार्कमध्ये समावेशाचा आराखडा करा:- आमदार शरद सोनवणे
1 min read
जुन्नर दि.१४:- जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाटातील सडे पठारे पर्यावरणीय समृद्ध असून, त्यांना जागतिक अनन्यसाधारण महत्व आहे. यांच्या संवर्धनातून आदिवासी भागाच्या पर्यारणीय शाश्वत विकासाठी संवर्धन करा.
या पठारांचा समावेश युनेस्कोच्या ग्लोबल जीओपार्कमध्ये करण्यासाठी आराखडा करा, असे पत्र आमदार शरद सोनवणे यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
पत्रात आमदार सोनवणे यांनी म्हटले आहे कि,‘‘ जुन्नर तालुक्याला प्राचिन सातवाहनकालिन, ऐतिहासिक पर्यावरणीय अनन्यसाधारण वारसा लाभला आहे. या वारशाला आंतरराष्ट्रीय महत्व असून, युनेस्कोच्या ग्लोबल जीओपार्कचा दर्जा या सडे पठारांना मिळू शकतो.
यासाठी युनेस्कोचा जीओपार्क कार्यक्रम असून, जुन्नर तालुक्यातील सडे पठारांना युनेस्कोचा जीओपार्क प्रोग्रॅममध्ये समावेश झाल्यास, या सडे पठारांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. यामाध्यमातनून सडे पठारांच्या संवर्धनातून पर्यटन विकास आणि विकासातून समृद्धी साधली जाणार आहे. म्हणून या पठारांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
