रयत प्रज्ञा शोध परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिराचे नेत्रदीपक यश

1 min read

बेल्हे दि.१८:- रयत शिक्षण संस्था, सातारा कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या रयत प्रज्ञा शोध परीक्षा (आरटीएस) मध्ये श्री बेल्हेश्वर माध्यमिक व कै. हरिभाऊ गुंजाळ उच्च माध्य विद्यालय, बेल्हे, जुन्नर विद्यालयाची गुणी व अभ्यासू विद्यार्थिनी स्वरा शरद कोकणे हिने ५४ वा गुणानुक्रम मिळवून ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये २०० गुणांची लेखी परीक्षा पार पडली होती. लेखी परीक्षेत १४४ गुण प्राप्त करून स्वरा मुलाखतीस प्रात्र ठरली होती. मुलाखत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर तिने अंतिम गुणवत्ता यादीत ५४ वा गुणानुक्रम मिळवला.या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनीला रयत प्रज्ञाशोध विभाग प्रमुख सीमा सुपेकर वर्गशिक्षक नितीन मुळूक तसेच विषय शिक्षक तुषार नांगरे, सुरेश साबळे, प्रताप चिंतामणी, रुक्सार शेख, रेखा पेटारे, जयश्री फापाळे यांनी मार्गदर्शन केले.स्वराच्या यशाबद्दल तिचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती, महिला तक्रार निवारण समिती,सखी सावित्री समिती तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!