चारणबाबा उत्सव आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर वर्धापन दिन सोहळा
1 min read
बेल्हे दि.१७:- चारण सेवा मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर नगर आणि पंचक्रोशीतील रहिवाशांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर नगर कोरडे मळा, बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे चारणबाबा उत्सव आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. १७ एप्रिल ते रविवार दि. १९ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
त्यानिमित्त अखंड हरिनाम महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ह.भ.प. रामदास महाराज कोरडे आणि शिवनेरभुषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांचे सायं. ५ ते ६ यावेळेत प्रवचन तसेच रात्री ७ ते ९ यावेळेत ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर (संगमनेर),
ह.भ.प. उमेश महाराज तापकीर (चिखली,पुणे), व ह.भ.प. सुदाम महाराज बनकर (साकोरी) यांचे सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन होणार आहे तरी या अपुर्व सोहळ्यास उपस्थित राहून अमृतमय श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे सेक्रेटरी अनिल कोरडे यांनी केले आहे.
