साकोरीच्या विद्यानिकेतन चा १०० टक्के निकाल; ओम भोर ने मिळवला पहिला क्रमांक

1 min read

साकोरी दि.१७:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी (ता.जुन्नर) चा शैक्षणिक वर्ष २०२५–२६ सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या रुपाली पवार-भालेराव यांनी दिली. या परीक्षेत ओम गोरक्षनाथ भोर याने ९३.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर द्वितीय क्रमांक अथर्व सतीश डुकरे (८९.४%), तृतीय क्रमांक शुभम विक्रम साळवे (८४.६%), चतुर्थ क्रमांक नम्रता दत्ता कुंजीर (८२.८%) आणि पाचवा क्रमांक वेदांत नवनाथ गाडगे (८२.४%) यांनी पटकवला.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे, पी. एम. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अथक मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत विशेष प्राविण्य मिळवले आहे. हा निकाल विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रुपाली पवार-भालेराव यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!