परसबाग स्पर्धेत स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे शाळेचा द्वितीय क्रमांक
1 min read
बेल्हे दि.५:- पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग स्पर्धा २०२५-२६ मध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा पारगाव तर्फे आळे चा आला आहे. या शाळेत अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे.

यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे आळे, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा वडमाळ बोरी चा आला आहे. तर प्रोत्साहन पर तीन शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव तर्फे म्हाळुंगे, चैतन्य विद्यालय ओतूर, शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी या शाळेचा समावेश आहे.

स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) शाळेच्या आवारात विद्यार्थांनी परसबाग बनवली असून एवढा उन्हाचा तडाखा असूनही ती ताजीतवानी ठेवले आहे. यात कोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदे, पालक, मेथी अशा विविध भाज्यांची लागवड केली आहे.

या शाळेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे व सर्व शिक्षण आपल्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्त अधिकच वेळ देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे नियमित लक्ष देतात. तसेच पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, गावच्या सरपंच रेश्मा बोरकर,
उपसरपंच रामचंद्र डुकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ तट्टू, उपाध्यक्ष हनुमंत भोर, सचिन डुकरे, पांडुरंग डुकरे यांसह सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य शाळेला लाभते.

