दिल्लीचा सलग दुसरा विजय; मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का

1 min read

नवीदिल्ली दि.५:- दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2026 मधील सलग दुसरा सामना जिंकला आहे. दिल्लीनं शनिवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं दिलेलं 163 रन्सचं आव्हान दिल्लीनं 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.दिल्लीच्या बाजूने निर्णायक अशा नाणेफेकीचा कौल लागला. अक्षर पटेल याने मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हार्दिक पंड्या याची तब्येत बरी नसल्याने सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली.सूर्यानेच मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच हिटमॅन रोहित शर्मा यानेही निर्णायक खेळी केली. सूर्याने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 51 रन्स केल्या. रोहितने 26 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. नमन धीर याने 28, मिचेल सँटनर याने 18 तर कॉर्बिन बॉश याने 11 रन्स जोडल्या. मुंबईने अशाप्रकारे 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 162 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी मुकेश कुमार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.मुंबईने 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 झटके दिले. दीपक चाहर याने केएल राहुल याला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. केएल 1 रन करुन आऊट झाला. तर बुमराहने दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याच बॉलिंगवर नितीश राणा याला झिरोवर रन आऊट केलं. त्यामुळे दिल्लीची 2 आऊट 7 अशी स्थिती झाली. त्यानंतर पाथुम निसांका, समीर रिझवी आणि डेव्हिड मिलर या तिघांनी दिल्लीला विजयी करण्यात योगदान दिलं. पाथमुने 30 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार लगावले. समीर रिझवी याने 51 चेंडूत 176.47 च्या स्ट्राईक रेटने 90 रन्स केल्या. समीरने या खेळीत 7 षटकार आणि 7 चौकार लगावले. समीरची या मोसमात सलग आणि एकूण 50 पेक्षा अधिक धावा करण्याची दुसरी वेळ ठरली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!