कानून के हाथ लंबे! ३५ वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोराला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

1 min read

बीड दि.२९:- बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ३५ वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत दरोडेखोराला अटक करून मोठी कामगिरी केली आहे. केज पोलीस ठाण्यात १९९१ मध्ये नोंदवलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी भागवत कमसऱ्या पवार हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता. जिल्ह्याभरात राबवल्या जाणाऱ्या फरार आरोपी शोध मोहिमेदरम्यान, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला हा आरोपी कोरेगाव येथील आपल्या घरी आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. हा आरोपी केवळ १९९१ च्या दरोड्याच्या गुन्ह्यातच नव्हे, तर २०१८ मधील अन्य एका गुन्ह्यातही पोलिसांना हवा होता.३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आरोपी जेरबंद झाल्याने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!