अग्निवीर सैन्य भरती (पुरुष) २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू:- श्रीकांत मदने

1 min read

पुणे दि.२२:- अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवारां कडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आळेफाटा येथील सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक श्रीकांत मदने यांनी केले आहे.पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी ०१ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.अशी माहिती श्रीकांत मदने यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!