पाडव्याच्या दिवशी श्री विजयदास काशिनाथ बाबांची यात्रा

1 min read

बेल्हे दि.१८:- बोरी खुर्द (साळवाडी ता.जुन्नर) येथे गुरुवारी दि.१९ रोजी गुढीपाडव्यानिमित्त श्री विजयदास काशिनाथ बाबांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती मंडळाने दिली आहे. सकाळी १० ते ११ बाबांचा अभिषेक व मांडव डहाळे, सायं.४ ते ५ विठ्ठल -रुक्मिणीभजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायं. ६ ते ७ वा. शेरणी (प्रसाद) वाटप होईल, सायं.७ ते ८ ते काठीची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी रात्री ८ वा. वाजता सृष्टी स्वरगंध हा नृत्याचा, हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!