डॉ. रमेश अशोक गायकवाड यांना उत्कृष्ठ क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार

1 min read

पुणे दि.२६:- भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. रमेश अशोक गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ठ क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक (शहर विभाग) हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. रमेश अशोक गायकवाड हे भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, पुणे येथे सन १९९६ पासून शारीरिक शिक्षण संचालक म्हणून गत ३० वर्षापासून अविरत सेवेत आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा व विद्यापरीषदेचे सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत ५ वेळा पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे यजमानपद भूषविलेले आहे. आजपर्यंत अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविलेले आहेत.सदर पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उपकुलगुरु डॉ. पराग काळकर व कुलसचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व मेडल असे होते. पुरस्कार वितरण समारंभास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सागर वैद्या, डॉ. विजय खरे, डॉ. प्रभाकर देसाई, कुलसचिव चारुशीला गायके, क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. रमेश गायकवाड यांचे कायम मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याने मा . बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव, शारीरिक संचालक डॉ. कॅप्टन रावसाहेब गरड यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे तसेच संचालक किशोर कु-हाडे, भाउ कु-हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ, सर्व प्राध्यापक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!