बी.एड. प्रशिक्षणार्थीनाचा छात्रसेवाकाळ उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न
1 min read
नारायणगाव दि.२५:- नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ज्ञानदा विद्यामंदिर या शाळेत डॉ. एम.ए. खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मंचर यांच्यावतीने छात्रसेवाकाळ उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका येवले मॅडम यांनी दिली. बी. एड प्रशिक्षणार्थीना शालेय जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा.
तसेच शालेय कामकाजा बद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी या छात्र सेवाकाळाचे आयोजन केले आहे या काळात प्रत्यक्ष अध्यापन, अनुभवीशिक्षक पाठ निरीक्षण, विविध शालेय व सहशालेय उपक्रम असे कार्यक्रम घेणार असल्याचे उपशिक्षक लामखडे सर यांनी सांगितले.
या छात्र सेवाकाळामध्ये शितल काठे,वर्षा जाधव, मिनल पाडेकर, विनायक बांगर, सारिका हासे, पुजा जाधव, धनश्री फलके,अपेक्षा पानसरे,तस्लिम मन्सूरी ,अनुजा माळवे या प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला आहे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्ञानदा विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि छात्रसेवा काळ विभाग प्रमुख प्रा जाधव सर उपस्थित होते.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक लामखडेसर यांनी सर्व छात्र अध्यापकांना शुभेच्छा दिल्या. छात्रध्यापक अश्विनी जाधव यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रियंका शिंदे यांनी आभार मानले.
