आई वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला ५१ हजारांची मदत
1 min read
लाखणगाव दि.२४:-लाखणगावचे पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे स्वर्गीय वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व स्वर्गीय माता कै. प्रमिला वसंत वाघ (आदर्श शिक्षिका) यांच्या स्मरणार्थ रुपये ५१००० रोख रक्कम लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी. साठी सुपूर्त केली.
सदर रक्कम शरद बँकेत एफ.डी. करण्यात येईल व दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येतील आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील असेही नमूद केले.
शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी भरीव रक्कम देणगी देणारे बाळासाहेब वाघ या दानशूर व्यक्तिमत्त्वांस आणि कार्यास मनःपूर्वक धन्यवाद व त्यांच्या माता-पित्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अशी माहिती न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी दिली.
