आणे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
आणे (ता.जुन्नर) येथे शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मराठा आंदोलनाचे जनक मनोज जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते गुरुवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.
आणे गावच्या वेशीवर वर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आला आहे. या आकर्षक पुतळ्याचे कौतुक जरांगे पाटील यांनी केले व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावच्या सरपंच प्रियांका दाते, उपसरपंच सुहास आहेर, पंचायत समितीचे सदस्य शांताराम दाते,
डॉ. दीपक आहेर, मधुकर दाते, प्रकाश दाते, बंडु आहेर, रंगनाथ आहेर, बाळासाहेब दाते,चेअरमन माऊली संभेराव, शैलेश आहेर, पाटील गाडेकर, बाबाजी देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
