जयहिंद फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

1 min read

कुरण दि.१६:- जयहिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानीच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळावा व त्यांचा व्यावसायिक, संशोधनात्मक दृष्टीकोन अधिक व्यापक व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनी अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड, कांचीगम एमआयडीसी दमन (गुजरात) येथे भव्य शैक्षणिक औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या 45 विद्यार्थ्यांनी या कंपनीला भेट दिली. अल्केम लॅबोरेटरीज ही १९७३ साली संप्रदा सिंग व बासुदेव सिंग यांनी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय कीर्तीची औषध कंपनी असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतात एकूण तीन यु.एस.एफ.डी.ए. मान्यताप्राप्त प्लांट आहेत. येथील सर्व उत्पादने अमेरिका, युरोप, जपान सह 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. त्यासाठी अतिशय कठीण तपासण्यांमधून ही सर्व औषधे प्रामाणित केली जातात आणि कंपनीला WHO-GMP, USFDA, MHRA यासारख्या आंतरराष्ट्रीय मानांकनांची मान्यता प्राप्त आहे. ही औद्योगिक भेट संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ तसेच विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांच्या सक्षम नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. यावेळी संदीप सूर्यवंशी (एच.आर.प्रमुख) यांनी विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल उद्योगातील बदलते तंत्रज्ञान, संशोधनाचे महत्त्व व करिअरच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन केले.या औद्योगिक भेटीदरम्यान अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड येथील तांत्रिक प्रशिक्षण केंद्र व्यवस्थापक विशाल कुशवाह यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली यामध्ये उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण विभाग (QC), सुरक्षा नियम, अत्याधुनिक यंत्र सामग्री, तसेच जागतिक दर्जाच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (GMP) याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्पादन प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभव घेताना उस्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विभागांच्या कार्य पद्धतीबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून अधिक माहिती घेतली. यामुळे हि भेट अधिक सवांदात्मक व ज्ञानवर्धक ठरली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तेजस पाचपुते यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना उद्योगाशी थेट जोडणारे असे उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक औद्योगिक भेटीसाठी सातत्याने आयोजित केल्या जातील.” अशा औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योगातील कार्यपद्धती, गुणवत्ता व्यवस्थापन व करिअरच्या संधीची प्रत्यक्ष माहिती मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा कौशल्य विकास साधला जातो सदर औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, अनुभव संपन्न आणि प्रेरणादायी ठरली असून, यामुळे विद्यार्थ्यांचा औद्योगिक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे.विद्यालयाचे प्राचार्य डॉ.तेजस पाचपुते यांनी कंपनीचे संदीप सूर्यवंशी (एच.आर.प्रमुख), तपस महापात्रा (प्लांट हेड), राकेश देसाई, महिपाल तोमर, पंकज सिंग, विशाल कुशवाह, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रतिक शाह यांचे पुष्पगुच्छ व तात्यांची स्मरणिका देऊन आभार व्यक्त केले. हा अभ्यास पाहणी दौरा नियोजन करण्यासाठी प्रा.डॉ.पल्लवी बढे, प्रा.गायत्री वायकर, प्रा.आदित्या सोनवणे, प्रा.सुचिता शेटे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!