बेल्ह्यात महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांची गर्दी

1 min read

बेल्हे दि.१६:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे महाशिवरात्र मोठ्या भक्तीभावाने साजरी झाली. बेल्हे गावातील सहा महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील बेल्हेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गावठानातील नागेश्वर महादेव मंदिरात सकाळी अभिषेक झाल्यानंतर दिवसभर भाविकांना खिचड़ी साबुदाना चिवडा व केळिचे वाटप करन्यात आले.संध्याकाळी आरती करन्यात आली. रात्री बारा वाजता अभिषेक व आरती करून उत्सवाची सांगता करन्यात आली. तसेच टक्यातील बेल्हेश्वर महादेवाची पालखी काढन्यात आली होती. नागेश्वर महादेव बेल्हेश्वर महादेव महाशिवरात्र साजरी करन्यासाठी शिवाजी डुंबरे, संतोष शिंदे, किरन शिवले, निलेश औटी, तान्हाजी औटी, संकल्प विश्वासराव यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!