जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात शांततेत मतदान

1 min read

बेल्हे दि.८:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पीआय विश्वास जाधव यांनी दिली.सकाळच्या सत्रामध्ये साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली होती परंतु दुपारनंतर मतदार घराबाहेर पडून मतदान केले. तसेच वयोवृद्ध व्यक्तींनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. मिळेल त्या वाहनाने येऊन वयोवृद्धांनी मतदान केले. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिरते पथकही तैनात करण्यात आले होते. गुंजाळवाडी, बेल्हे, राजुरी, मतदान केंद्र बाहेर दुपारी गर्दी वाढली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!