मॉडर्नच्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1 min read
बेल्हे दि.३०:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केजी पासून बारावीपर्यंत विद्यार्थी या शाळेत शिकले त्यामुळे आपले अनुभव सांगताना विद्यार्थी गहिवरून गेले होते.
तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या विद्या गाडगे म्हणाल्या की, तुम्हींच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. निर्णयाची क्षमता बुद्धीत असते, तन,मन आणि बुद्धीचा विकास म्हणजे सर्वांगिण विकास तो झाला की जीवनातील सगळी वादळ झेलन्याची ताकद येते. प्रत्येक क्षण हा अध्ययनप्रण असतो.
विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून उज्ज्वल यश संपादित करावे.संस्थेचे सीईओ यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तसेच उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.१० वी १२ च्या विद्यार्थ्यांनी शाळेला तसेच शाळेतील सर्व शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांना, भेटवस्तू दिल्या.
या वेळी संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे, प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. १० वी च्या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी तर १२ वीच्या १८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून
परीक्षेसाठी माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीइओ शैलेश ढवळे यांसह सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
