राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना एन एस पी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरु
1 min read
पुणे दि.१६:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन २०२५-२६ साठी नुतनीकरणास पात्र असलेले तसेच सन २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले विद्यार्थी, जे विहित कालावधीत अर्ज करु शकले नव्हते त्यांच्यासाठी एन एस पी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एन एस पी २.० पोर्टलवर २२ जानेवारी १०२६ पूर्वी ऑनलाईन सादर करुन घ्यावेत. तसेच सर्व अर्जांची प्रथम स्तर व द्वितीय स्तर पडताळणी पूर्ण करावी.
कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने व वेळेत पूर्ण करण्याबाबत कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांनी पसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
