न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींना रुपये ४५ हजाराचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप
1 min read
लाखणगाव दि.३:- राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित इंग्लिश स्कूल लाखणगाव (ता.आंबेगाव) शाळेत राजमाता जिजाऊ भोसले जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना
रक्कम रुपये 45000 किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले.यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष
आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली. शिक्षकांचे सहकार्य लाभले.
