शिवछत्रपती नगर विकास संस्थेने जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप
1 min read
आळेफाटा दि.२८:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील शिवछत्रपती नगर विकास संस्थेने जमीन गट नं. ३५५ मध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप राहुल रामदास खोकले यांनी केला होता.अर्जदाराने उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगाव उपविभाग मंचर (पुणे) यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
खोकले यांनी आरोप केला आहे की, संस्थेने जमिनीवर शाळेची इमारत बांधताना जागेवर अतिक्रमण केले आहे. ही इमारत “शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा” या नावाने ४ थी ते १० वीच्या वर्गासाठी चालवली जात आहे. अर्जदारानी सांगितले की बांधकाम बेकायदेशीर असून त्यामुळे सरकारी जमिनीचे नुकसान होत आहे.
उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे यांनी निकाल पत्रात आदेश दिले आहेत की सदर बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करणे नियमांतर्गत ठरत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४५ नुसार दंड आकारणी करणेबाबतची कार्यवाही तहसिलदार जुन्नर यांनी करावी.
संस्थेने जमिनीवर शाळेची इमारत बांधली आहे.अर्जदाराने आरोप केला आहे की, सदर संस्थेने जमीन मिळकतीवर शाळेची इमारत बांधताना जिल्हाधिकारी व नगर रचना व नगर विकास विभाग यांचेकडून विनंती तसेच बांधकाम परवानगी घेतलेली नाही.उपविभागीय अधिकारी यांनी आदेश दिले आहेत
की सदर बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करणे नियमांतर्गत ठरत आहे व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४५ नुसार दंड आकारणी करणेबाबतची कार्यवाही तहसिलदार जुन्नर यांनी करावी. सदर आदेशाची अंमलबजावणी तहसिलदार जुन्नर यांनी करावी व बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करावे.असे आदेश देण्यात आले आहे.
संस्थेने आळेफाटा (वडगाव आनंद) गट नंबर ३५५ मध्ये इमारत बांधकाम करताना मा. जिल्हाधिकारी पुणे तसेच नगर रचना आणि नगर विकास विभाग यांच्याकडून बिनशेती तसेच बांधकाम परवानगी घेतलेली नाही.सदर जमीन मिळकतीवर सध्या अस्तित्वात असलेले इमारती २४ वर्षांपूर्वी बांधलेली आहे.सदर शाळा इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर आहे.
या तक्रारदाराच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून आले. संस्थेने इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केल्याबाबत कागदपत्रे चौकशी समिती सादर केलेली नाहीत.शाळेच्या पाठीमागील बाजूस सीमा भिंत संस्थेने अथवा शाळेने बांधलेली नसून सदरची सीमा भिंत सार्वी निसर्ग गृहनिर्माण सोसायटीने बांधलेली आहे.
त्याच्याशी संस्था अथवा शाळेचा कोणताही संबंध नाही असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी लेखी दिले आहे तसेच पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा शाळेच्या बाजूने जात असून सदर कालव्याची गळती झालेली आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी शाळेच्या प्रारणामध्ये येते सदरची बाब खरी आहे.
याबाबत अध्यक्ष शिवछत्रपती नगर विकास संस्था आळेफाटा यांनी अभियंता पाटबंधारे विभाग नारायणगाव जुन्नर,पुणे यांना दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी कॅनॉलचे पाणी गळती त्वरित थांबवावी व लवकरात लवकर दुरुस्ती करावी याकरता पत्र व्यवहार केल्याची दिसून येत आहे.
