IPA आळेफाटा लोकल ब्रँच अंतर्गत VJSM Inst of Pharmacy आळे येथे पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रम संपन्न
1 min read
आळेफाटा दि.२४:- VJSM Inst of Pharmacy महाविद्यालयात इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA) – आळेफाटा लोकल ब्रँच यांच्या अंतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता विकसित करणे हा होता.
कार्यक्रमा साठी मुख्य अतिथी व परीक्षक म्हणून Dr. गौरी घंगाळे व आरती घोरपडे असिस्टंट प्रोफेसर अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी यांची उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे सीईओ आणि आयपी आळेफाटा लोकल ब्रांच चे अध्यक्ष डॉ. डी डी गायकवाड, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.आर ए हांडे,
महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.विशेष बाब म्हणजे मुख्य अतिथी हे याच संस्थेचे माजी विद्यार्थी असून, ही बाब संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
त्यानंतर मुख्य अतिथी व परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून विद्यार्थी उपस्थित राहिले. जवळपास १२ महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला आणि सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी विविध औषध शास्त्रीय विषयांवर पोस्टर सादर केली व परीक्षकांकडून मौल्यवान मार्गदर्शन प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये डी. फार्मसी गटा मधून ऋषिकेश शेळके (मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव) याने प्रथम क्रमांक मिळविला. मानसी वनवे आणि रेश्मा तांबोळी (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तसेच श्रद्धा चौधरी (व्ही जे एस एम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे)
आणि काजल पावळ व पायल वायाळ (सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.बी फार्मसी गटामधून ओम खैरे व प्रसाद झोडगे (व्ही जे एस एमविशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. फिरदोस शेख व उमामा शेख
(जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तसेच वैष्णवी मोरे व तृप्ती चौधरी (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे) आणि वरद कसार व तेजस सरा (डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्था व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व IPA आळेफाटा लोकल ब्रँच यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
