पारगावात तिसरा बिबट्या जेरबंद

1 min read

पारगाव दि.२०:- पारगाव तर्फे आळे येथे घटना स्थळापासून ५०० मीटर अंतरावर शनिवार दि.२० रोजी पहाटे तिसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे. सदर ६ ते ७ वर्ष वयाचा नर बिबट असून तुकाराम भोर यांच्या (गट नंबर १६५) शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील रामवाडी येथे ८ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने १५ पिंजरे आणि १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.या हल्ल्यात रोहित कापरे या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवार दि.१६ रोजी रात्रीच्या सायंकाळच्या सुमारास घटना घडलेल्या ठिकाणी ५ वर्ष वयाचा नर बिबट जेरबंद करण्यात आला होता. तर बुधवार दि.१७ पहाटेच्या सुमारास दुसरा बिबट जेरबंद करण्यात आला होता.जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस, ओतूरचे वनपरिक्षेत्राधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम कार्यरत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!