भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरण करण्यासाठी मुदतवाढ
1 min read
नागपूर दि.१३:- भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरण करण्यासाठी लागू असलेल्या नियमांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, सुधारित नियम आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. हे रुपांतरण सवलतीच्या दराने करता येणार असून न्यायालयीन व प्राधिकरणीय कारणांमुळे विलंब झाल्यास सवलत मिळणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर दोन्ही सभागृहात निवेदन सादर केले.मुंबईतील अनेक दशके जुन्या शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे अत्यंत कठीण झाले होते. पीएमएवाय अंतर्गत मिळणाऱ्या वाढीव
एफएसआयमधील २५ टक्के एफएसआय शासनाला देण्याची अट असल्याने या संस्थांना योजना लाभदायक ठरत नव्हती. हे वास्तव विचारात घेऊन स्वयं-पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमएवायच्या वाढीव एफएसआय तील २५ टक्के देण्याची अट वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयांमुळे वर्ग-२ ते वर्ग-१ रुपांतरण प्रक्रियेला गती मिळेल, न्यायालयीन/प्राधिकरणीय कारणांमुळे अडकलेली प्रकरणे मार्गी लागतील, तर मुंबईतील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं-पुनर्विकासास मोठा दिलासा मिळणार आहे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
