“शांतता, मॉडर्न वाचत आहे”

1 min read

बेल्हे दि.१२:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता. जुन्नर) येथे महिन्यातील प्रत्येक रविवारी ‘शांतता मॉडर्न वाचत आहे’ सामूहिक एक तास वाचनाचा’ उपक्रम राबवण्यात येतो. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्या सामूहिक एक तास पुस्तक वाचतात.शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ पासून शाळेत परिपाठ झाल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियमित एक तास वाचन करतात. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होते, शब्दसंग्रह वाढतो, ज्ञानाचा प्रसार होतो, शब्दभांडार समृद्ध होते, आत्मविश्वास वाढवणे, ज्ञानाची भूक वाढवणे असे विविध उद्देश सफल होतात. लहान विद्यार्थ्यांना सुरुवातीला चित्र असलेली छोटी वाक्ये असलेली पुस्तके वाचायला दिली. नंतर जोडाक्षरे, मोठी वाक्ये आणि मग कथा, कादंबऱ्या वाचायला दिल्या जातात. या उपक्रमामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये फरक दिसत असून विद्यार्थी वाचन कौशल्य आत्मसात करताना दिसत आहेत. दिवसभर शाळेत मिळणाऱ्या मोकळ्या वेळेतही विद्यार्थी वाचताना दिसत आहेत.घरीही स्वतःहून वाचण्याची विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली आहे. या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे यांनी कौतुक केले.

——-
प्रतिक्रीया

‘नियमित वाचन केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होते. मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते,
सामाजिक विचारांची स्पष्टता येते. हा उपक्रम केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून, तो एक मोठी ‘वाचन संस्कृती’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

विद्या गाडगे,
प्राचार्या मॉडर्न इंग्लिश स्कूल
———-

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!