दहावी उत्तीर्णांसाठी २५,४८७ सरकारी पदांची मेगा भरती सुरू:- श्रीकांत मदने

1 min read

जुन्नर दि.१०:- कर्मचारी निवड आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांसाठी भव्य भरती जाहीर झाली आहे.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान संगणक-आधारित पद्धतीने होणार आहे.एकूण रिक्त जागा-२५,४८७ असून पुरुष उमेदवारांसाठी – २३,४६७ जागा तर महिला उमेदवारांसाठी – २,०२० जागा आहेत. उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेण्याचे आवाहन आळेफाटा येथील सूर्या करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मुरलीधर मदने यांनी केले आहे.या संदर्भात श्रीकांत मदने अधिक माहिती देताना म्हणाले की, यामधून निवड झाल्यास उमेदवारांना BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF मध्ये संधी मिळणार आहे.श्रेणीनुसार जागांची संख्या पुढील प्रमाणे:- SC – ३,७०२, ST – २,३१३, OBC – ५,७६५, EWS – २,६०५, UR – ११,१०२अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२५, रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख:- १ जानेवारी २०२६ फॉर्म करेक्शन- ८ ते १० जानेवारी २०२६🎓 शैक्षणिक पात्रता📘 उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक, NCC प्रमाणपत्रधारकांना ५% बोनस मार्क्स*वयोमर्यादा*🔸 सर्वसाधारण उमेदवार – १८ ते २३ वर्षे, SC/ST – वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट, OBC व माजी सैनिक – ३ वर्षांची सूट *अर्ज प्रक्रिया* उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी: ssc.gov.in

*अर्ज कसा करावा?*
1️⃣ प्रथम ‘One Time Registration’ (OTR) पूर्ण करा2️⃣ लॉगिन करून GD Constable फॉर्म भरा
3️⃣ वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरा
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5️⃣ ₹100 अर्ज शुल्क ऑनलाइन भरा
6️⃣ फॉर्म सबमिट करून त्याची प्रत जतन करा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!