मराठा आरक्षणाच्या निर्णयांची गतीने अंमलबजावणी करा:- डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
1 min read
नागपूर दि.१०:-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उप समितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नागपूर विधानभवनात मराठा आरक्षण व सारथी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीतील ठळक मुद्दे: मराठा आरक्षण: आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
तसेच न्यायालयात सुरू असलेल्या याचिका आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.सारथी संस्था: ‘सारथी’ संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व शिष्यवृत्ती योजना अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करण्याबाबत चर्चा झाली. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
