पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील:- गजानन पाटील

1 min read

पुणे दि.१०:- पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी इतरत्र जे काही सर्वोत्तम आहे त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी, जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवार्थ त्या सर्वोत्तमाचे अनुकरण करण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर आहे.याच भावनेतून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी देशातील पहिला “स्मार्ट अँड इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प” सातनवरी (जि. नागपूर) या गावात भेट दिली. महाराष्ट्र शासन, नागपूर जिल्हा परिषद व टेली कम्युनिकेशन क्षेत्रातील समन्वयक ‘व्हॉइस’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शेती, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान सातनवरी या गावात आस्थापित करण्यात आलेले आहे. या सर्व तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती गजानन पाटील यांनी जाणून घेतली. टेली मेडिसिन कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग उपक्रमांची देखील माहिती जाणून घेतली. वातावरणातील सूक्ष्म बदलांचा अचूक वेध घेणारे शेतातील सेन्सर्स, शेताच्या रक्षणासाठी वापरात आणले जाणारे ड्रोन यांची देखील सविस्तर माहिती श्री. गजानन पाटील यांनी घेतली.या अभ्यास दौऱ्यात पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, नागपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सरपंच वैशाली चौधरी, उपसरपंच अनिल गोतमारे, व्हॉइस इंडिया कंपनीचे प्रतिनिधी तसेच सातनवरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!