मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान ची प्रतिष्ठा वृद्धिंगत

1 min read

कर्जुले हर्या दि.८:- राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जुले हर्या (ता.पारनेर) उपप्राचार्य व आयक्यूएसी इंचार्ज डॉ. कृपाल पवार यांना श्रीनिवास विद्यापीठ, मंगळूरु, कर्नाटक यांच्याकडून पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी सह-मार्गदर्शक (Co-Mentor) म्हणून मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे संशोधन क्षेत्रात संस्थेची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत झाली असून, उच्च शिक्षण आणि संशोधन मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.डॉ. कृपाल पवार यांच्या दीर्घ संशोधन अनुभव, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाची दखल घेत श्रीनिवास विद्यापीठाने ही मान्यता प्रदान केली आहे. या माध्यमातून विद्यापीठातील पोस्ट-डॉक्टरल संशोधकांना मार्गदर्शनाचा नवा पाया मिळणार असून, विविध आंतरशाखीय विषयांमध्ये संशोधन सहकार्य वाढण्यास मदत होणार आहे.कॉलेजचे सचिव किरण आहेर, अध्यक्षा मीरा आहेर, सीईओ डॉ. दीपक आहेर, तसेच खजिनदार बाळासाहेब उंडे यांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन करत भविष्यातील संशोधन उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.ही मान्यता मिळाल्याने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेत अधिक भर पडणार असून, विद्यार्थ्यांमध्येही संशोधनाची प्रेरणा निर्माण होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!