महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब लामखडे व सचिव पदी प्रणव काळे यांची निवड
1 min read
जुन्नर दि.४:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब रतन लामखडे तर कार्यवाह (सचिव) पदी प्रणव नंदकुमार काळे यांची निवड.बुधवार दि ३ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशीद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये जुन्नर तालुक्याच्या नूतन कार्यकारणीची नियुक्तीपत्रे देण्यात आली.
कार्यकारणी निवड समितीच्या बैठकीमध्ये बाळासाहेब रतन लामखडे यांची जुन्नर तालुका अध्यक्षपदी तर प्रणव नंदकुमार काळे यांची कार्यवाहपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर कैलास बाबुराव शिंदे, रमाकांत शंकर फापाळे,
अभिजीत अशोक भुजबळ यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्याध्यापक संघाचे संजय वाघ यांनी केली. कार्यकारणीच्या इतर सदस्यांमध्ये शरद कचरू मनसुख, विठ्ठल दत्तात्रय गडगे यांची कार्याध्यक्षपदी तर सहकार्यवाह म्हणून प्रशांत आसाराम अहिर व अविनाश शरद शेटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची
घोषणा शिवनेर विद्यालय धोलवड चे मुख्याध्यापक समीर वामन यांनी केली. कोषाध्यक्षपदी दीपक धनराज पाटील तर संघटन मंत्री म्हणून अशोक श्रीराम पाटील, भाऊ हौशीराम वेडे, लक्ष्मण बबन डुंबरे, ज्ञानेश्वर दत्तात्रय सस्ते व शरद रावसाहेब ताठे यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा ग्रामीणचे संघटन मंत्री कैलास करपे यांच्या हस्ते कार्यालय मंत्री म्हणून महादेव लक्ष्मण डिसले, ज्ञानेश्वर रावजी वाघ, संजय तानाजी लांडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर कार्यकारणी सदस्य म्हणून ज्ञानेश्वर बबन नायकोडी, विजय नामदेव चव्हाण, संदीप शेलार, काशिनाथ केरू वाकचौरे, रमेश तानाजी जाधव,
व्यंकट मुंडे, प्रशांत थोरात व संजय उंडे यांची नियुक्ती करण्यात आली.महिला आघाडी प्रमुख म्हणून रोहिणी काशिनाथ वाकचौरे, स्मिता प्रवीण कानडे, अनुपमा पाटील, संगीता जयसिंग गाडेकर व शिला ईश्वरचंद्र पोखरकर यांच्याकडे पदभार देण्यात आला.
या कार्यकारिणीला मार्गदर्शक म्हणून राजेंद्र पोपटराव शहाणे, समीर अंबादास वामन, इम्तियाज नबीलाल मुलानी, दत्तात्रय कारभारी गुंजाळ डॉ. दीपक घाडगे, महेंद्र देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. सभेचे सूत्रसंचालन कैलास शिंदे यांनी केले तर प्रणव काळे यांनी आभार मानले.
