विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल
1 min read
पुणे दि.४:- पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे वाहतूक बदल आदेश जारी केले आहेत. ३१ डिसेंबर २०२५ सायं. ५ वा. ते १ जानेवारी २०२६ रात्री १२ वा
🔹चाकण ⇄ शिक्रापूर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग.🔹अहिल्यानगर → पुणे/मुंबई शिरुर → न्हावरा फाटा → न्हावरा → पारगाव → चौफुला → यवत → हडपसर → पुणे🔹 पुणे → अहिल्यानगर खराडी बाह्यवळण → हडपसर → पुणे-सोलापूर महामार्ग → चौफुला → केडगाव → न्हावरा → शिरुर → अहिल्यानगर
🔹 सोलापूर महामार्गावरून आळंदी/चाकण हडपसर → मगरपट्टा → खराडी बाह्यवळण → विश्रांतवाडी → आळंदी → चाकण हलकी वाहने (कार/जीप) 🔹 मुंबई → अहिल्यानगर वडगाव मावळ → चाकण → खेड → पाबळ → शिरुर → अहिल्यानगर🔹 मुंबई/ठाणे येथून येणारी अनुयायी वाहने मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूरोड → निगडी → चऱ्होली → आळंदी → मरकळ → तुळापूर फाटा (लोणीकंद)
