आजी-आजोबा नातवाच्या शाळेत खेळण्यात दंग; मॉडर्न मध्ये ‘एक दिवस आनंदाचा नातवंडांच्या शाळेतला’ उपक्रम
1 min read
बेल्हे दि.१:- मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘एक दिवस नातवंडांच्या शाळेत’ या उपक्रमांतर्गत आजी- आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.उपस्थित सर्व आजी-आजोबांचे स्वागत हे नातवंडांच्या हस्ते गजरा व पुष्प देऊन करण्यात आले.
आपले वय, आजारपण, सर्व जबाबदारी विसरून सर्व आजी-आजोबा खेळ खेळण्यात दंग झाले. नातवंडांच्या बालपणात आपल्या मुलांचे बालपण शोधणारे आजी आजोबा या वेळी स्वतःच बालपणात रमले. आमच्या मुलांना शिक्षणासोबतच संस्कार देणारी शाळा म्हणजे मॉडर्न इंग्लिश स्कूल व आई-बाबांसोबत आजी आजोबा ही शाळेचा एक घटक
मानल्याबद्दल पालकांनी शाळेचे आभार मानले. मुलांना शाळे बरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी “आजी आजोबा” दिवस साजरा महत्त्वपूर्ण ठरला.उत्कृष्ट निवेदक सोमनाथ सूर्यवंशी यांनी आजी-आजोबांसाठी अनेक मनोरंजनात्मक खेळ आयोजित केले.
सर्व विजेत्या आजी आजोबांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी १५० हून अधिक आजी – आजोबा उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना असलेली शिस्त, संस्कार, शैक्षणिक, सामाजिक व भावनिक प्रगती याबद्दल आजी आजोबांनी शाळेचे कौतुक केले.
आमच्या नातवंडा सोबतच आम्ही पुन्हा एकदा शाळेचा व आपल्या बाल वयाचा अनुभव घेतला. या सुंदर आजी आजोबा दिवसाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. प्राचार्य विद्या गाडगे यांनी सर्व आजी आजोबांच्या या वयातील उत्साहाबद्दल कौतुक केले व आभार मानले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
या वेळी प्राचार्या विद्या गाडगे,विश्वस्त दावला कणसे,शिक्षक विद्यार्थी, आजी- आजोबा उपस्थित होते. उपस्थित सर्व आजी आजोबांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे तसेच सर्व संचालक मंडळाने मानले.
