ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास
1 min read
Oplus_16908288
मुंबई दि.२४:- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.

हिंदी सिनेविश्वात त्यांच्या कारकिर्दीने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अद्वितीय अभिनय शैलीने, प्रभावी संवादांनी आणि भावनांनी भारलेल्या भूमिकांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केले.

