श्री संभाजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी शिक्षक मेळावा 41 वर्षीनी भेटले गुरु शिष्य
1 min read
बेल्हे दि.७:- बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री संभाजी विद्यालयातील १९८३ -८४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी ४१ वर्षांनी पुन्हा एकत्र आले. या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आळेफाटा या ठिकाणी पार पडला.माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्याला २५ माजी विद्यार्थी तर दोन शिक्षक उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्यात विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या वंदना जाधव, बाळासाहेब जाधव, संजय टेंभे, मारुती खिलारी, बाळासाहेब पाटोळे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित असलेले अध्यक्ष स्थानी विज्ञान शिक्षक बबनराव शिंगोटे हे होते, पर्यावरण संरक्षक शिवराम गुंजाळ सर या दोन्हीही शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींनाही या प्रसंगी उजाळा दिला.
विद्यालयातील तत्कालीन शिक्षकांची कडकशिस्त, उत्तम शिकवणूक, विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव यामुळेच आम्ही आज यशस्वी झालो आहोत. त्यामुळे संस्थेचे संस्थापक बा. रा. घोलप व तत्कालीन सर्वशिक्षक यांचे आम्ही ऋणी असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अध्यापक शिवराम गुंजाळ यांनी आपल्या भाषणात स्नेह मेळाव्याची गरज, थोरांविषयीची कृतज्ञता, मोबाईलच्या वाढत्या समस्या आणि त्याविषयी घ्यावयाची सावधानता याविषयी विचार व्यक्त केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी मारुती खिलारी, बन्सीधर जाधव, बाळासाहेब जाधव, वंदना दळवी दत्तात्रय औटी ,शिवाजी पटाडे यांनी.विशेष परिश्रम घेतले.
