मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट?

1 min read

जालना दि.७:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द जरांगे पाटील यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आपण मृत्यूला घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “माझ्या हत्येचा कट एका मोठ्या व्यक्तीने रचला गेला असून या प्रकरणात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून आहेत. मी उद्या सकाळी अकरा वाजता याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार, असे जरांगे यांनी एका वृत्त वहिनीला सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!