प्रकाश लामखडे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

1 min read

मंगरूळ दि.६:- आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक प्रकाश लामखडे यांनी जुन्नर,आंबेगाव,खेड, शिरु र तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुले महिलांसह अनेक नागरिक मृत्युमुखी पडल्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच विविध 10 मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरू केले. या हल्ल्यांमध्ये जे नागरिक जखमी झाले आहेत त्यांना उपचारांचा सर्व खर्च तसेच अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये नुकसान भरपाई व मृत्यू झाल्यास १ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.पाळीव प्राणी शेळी, लहान वासरू इत्यादीचा मृत्यू झाल्यास १५ हजार रुपये तसेच मोठी गाय किंवा बैल यांचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कर्मचाऱ्यांचा १ कोटी रुपयाचा विमा सरकारकडून उतरवण्यात यावा. पिंजऱ्यांची क्षमता वाढवावी, बिबट निवारण कृती समिती स्थापन करून त्या समितीच्या देखरेखीखाली पकडलेले बिबटे माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सोडण्यात यावेत, माणिकडोह बिबट निवारण केंद्राचीही क्षमता वाढविण्यात यावी, बिबट्या पकडल्यानंतर त्याला टॅग लावण्यात यावा, पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी यापैकी काही मागण्या त्वरित मंजूर करून उर्वरित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक महिन्याचा अवधी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर प्रदिप चव्हाण, वनपाल बेल्हे निलम ढोबळे,वनरक्षक स्वप्नील केदारी,राजेंद्र गाढवे, विश्वराज सोळुंके यांनी मागितला आहे.यावेळी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव टेमकर यांनी प्रकाश लामखडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आमरण उपोषणात सहभाग घेतला व बिबट्या हा वन्य प्राणी असून त्याचा नैसर्गिक अधिवास जंगल आहे. तरी जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यातील मानवी वस्तीमध्ये जवळपास दीड ते दोन हजार बिबटे असण्याची शक्यता व्यक्त केली हे सर्व बिबटे तात्काळ पकडून ते या परिसरापासून २०० किलोमीटर पेक्षा अधिक असलेल्या ताडोबा,अंधेरी सारख्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये (राखीव वन क्षेत्रांमध्ये) सोडण्यात यावेत तसेच त्यांना रेडिओ कॉलर बसवून त्यांच्या संचारावर व वर्तणुकीवर लक्ष ठेवून त्यांचा अभ्यास करावा व जर असे बिबटे पुन्हा मानवी वस्तीमध्ये आले तर त्यांना ड्रोनद्वारे बेशुद्ध करून पुन्हा वनक्षेत्रात सोडण्यात यावे अशा प्रकारचा प्रकल्प वनखात्याने राबवावा ही मागणी केली.यावेळी आर एफ ओ चव्हाण साहेब यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत होत असलेल्या बिबट निवारण समस्येबाबतच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याविषयी विनंती केली व या मागणी संदर्भात तत्परतेने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तोपर्यंत हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्यात यावे अशी विनंती केली. त्यानुसार उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी यांनी दिला.यावेळी आम आदमी पक्षाचे सुनील खिलारी, संजय चव्हाण, अनिल भोर, महेश थोरात तसेच वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, सरपंच मनीषा खिलारी, सुरेखा लामखडे, अर्जुन खराडे, माऊली खराडे, सावळाराम लामखडे, सुरज शिंदे, गोपीनाथ लामखडे, सुखदेव लामखडे, किरण गोत्राळ, होमगार्ड गणेश गाडगे, सुनिल गहिने, निलेश गाडगे, माऊली भालेराव, दिनेश लामखडे, छगन लामखडे, भगवान लामखडे, नितीन नवगिरे विजय डुकरे, खंडेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अशोक खिलारी तसेच मंगरूळ पारगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!