पारगावात अखंड हरिनाम सप्ताह च्या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात

1 min read

पारगाव दि.६:- स्मार्ट व्हिलेज पारगाव (ता.जुन्नर) येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा बुधवार दि. ५ नोव्हेंबर ते गुरुवार दि.१३ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. श्री काळभैरवनाथ महाराज जन्माष्टमी, श्री कैवल्यसाम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव, श्री संत तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठ गमन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भक्ती पंढरी सुवर्ण महोत्सवाचं गावात आयोजन करण्यात आलं आहे. पहाटे ५ ते ७ काकडा भजन, सकाळी ७ ते ११:३० संत तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण, दुपारी ३:३० ते ४:३० प्रवचन, सायंकाळी ४:३० ते ५:३० हरिपाठ, सायंकाळी ६ ते ८ हरिकीर्तन, ८:३० वाजता महाप्रसाद, त्यानंतर जागर या कालावधीत असा दैनंदिन कार्यक्रम असेल. या निमित्त मंगळवार दि.४ रोजी गावातून भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ मिरवणुकीमध्ये उत्साहात सहभागी झाले होते.महिलांनी डोक्यावर कलश,हातात टाळ, लेझिम घेतला होता. शेवटच्या दिवशी गुरुवार दि.१३ रोजी श्री काळभैरवनाथ महाराज पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे. तसेच कीर्तन केसरी हभप पांडुरंग महाराज गिरी यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. येणाऱ्या भाविकांची ग्रामस्थांनी मोठी व्यवस्था केली असून सुमारे पाच हजार भाविक बसतील असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!