हिवरे तर्फे नारायणगाव च्या संशयित दोडेखोराचे पोलिसांकडून छायाचित्र प्रसिद्ध ; मारहाण करून २० तोळे दागिने लुटले; कुटुंबातील व्यक्तींना केली मारहाण

1 min read

नारायणगाव दि.२०:- हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील सातपुडा वस्तीमधील बंगल्यावर अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी दरोडा टाकून कुटुंबातील ४ जणांना गंभीर दुखापत करून सुमारे २० तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना आज सोमवार (दि. १९) मध्यरात्री २ वा सुमारास घडली.

नारायणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून दरोड्यातील संशयित आरोपीचे छायाचित्र पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

संशयित व्यक्ती अढळल्यास नारायणगाव पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेश मुरलीधर भोर (वय ४० रा.हिवरे तर्फे नारायणगाव,सातपुडा मळा, ता. जुन्नर) यांनी फिर्याद आहे. याघटनेत गणेश मुरलीधर भोर ( वय ४१), रंजना मुरलीधर भोर (वय ५५), शंकर रभाजी भोर (वय -७०), प्रमिला गणेश भोर (वय – ३५) यांना गंभीर दुखापत झाली आहे.

हिवरे तर्फे नारायणगाव येथे सातपुडा मळ्याच्या रस्त्यालगत गणेश मुरलीधर भोर यांचा बंगला आहे.

बंगल्यात कुटुंबातील ८ जण राहत आहे. सोमवार मध्यरात्री दाखल केले. २ वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोरांनी टेरेसवरून बंगल्यात प्रवेश करुन रूम मधील दोन कपाटे फोडून सुमारे १५ ते २० तोळे सोने काढून घेतले. यावेळी प्रमिला भोर, रंजना मुरलीधर भोर यांना कोयत्याने हातावर मारहाण करून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र काढून घेतले.

त्याच वेळी आरडाओरडा सुरु झाल्याने आवाजाच्या दिशेने चुलते शंकर भोर आले असता, दरोडेखोरांनी चुलते व आईला विटा फेकून जखमी केले. तसेच गणेश मुरलीधर भोर यांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अडीच वाजता या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धूर्वे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गावडे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पाहणी केली.

घटनेचा नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपासासाठी रवाना झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे