खिडकीचे गज कापून चोरट्यांचा घरात प्रवेश; तीन लाखाचे दागिने लंपास
1 min readराजुरी दि.१९:- राजुरी (ता.जुन्नर) येथील घंगाळे मळयात रहात असलेले भरत ज्ञानेश्वर घंगाळे याच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोक रक्कम व ३ लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,घंगाळे कुटुंबीय घराच्या हॉलमध्ये झोपलेले असताना चोरटयांणी रविवार दि.१८ रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश करुन आतील रुम मध्ये असलेल्या कपाटातील ३ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेले. आपल्या घरात चोरी झाली आहे. याची माहिती त्यांणा सकाळी कळाली .तसेच याच मळयात रहात असलेले निवृत्ती नारायण घंगाळे यांचे बंद घर देखील चोरट्यांणी फोडले आहे.
घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगउजर यांणी भेट देऊन पंचनामा केला आहे. भरत घंगाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
चोरीस गेलेला ऐवज खालील प्रमाणे
1) 2,63,000/- एक सोन्याचे मणीमंगळसुत्र (59.280 ग्रॅम वजनाचे) 2) 20,000/- कानातील सोन्याचे दोन वेल, 05 ग्रॅम वजन 3) 24,753/- कानातील दोन सोन्याचे झुमके, 7.5 मि.ग्रॅम वजन 4) 6,950/- सोन्याची कुडी,दिड ग्रॅम वजन 5) 5,000/- रू. रोख रक्कम, त्यात 500, 100, 200 रू.दराच्या नोटा
एकूण ऐवज 3,19,703 /-