डॉ.के.एस.खराडे फाउंडेशन च्या कार्याध्यक्ष पदी उद्योजक संभाजी चव्हाण यांची निवड

1 min read

पारगाव तर्फे आळे:- डॉ.के.एस.खराडे फाउंडेशन च्या ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक अध्यक्ष भिकाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्वानुमते संभाजी चव्हाण यांची संस्थेच्या कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या नवनियुक्त विश्वस्तपदी डॉ. दत्ता चव्हाण,डॉ. किरण लामखडे, प्रशांत तट्टू, कैलास खामकर, योगेश डुकरे, सुभाष चव्हाण, निलेश येवले, स्वप्नील डुकरे, राजाराम डुकरे, युवराज तट्टू यांची निवड करण्यात आली.सभेसाठी पारगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच रेश्मा बोटकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजी डुकरे, पंचायत समिती जुन्नर चे माजी उपसभापती शिवाजी चव्हाण, पारगाव तर्फे आळे शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन रामदास चव्हाण, उत्तम फाफाळे, अर्चना डुकरे निवृत्ती चव्हाण, अविनाश तट्टू तसेच सभासद , ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ.के एस खराडे फाउंडेशन मागील आर्थिक वर्षाचा ताळेबंद, अहवाल संस्थेचे सचिव विकास चव्हाण यांनी वाचला तसेच संस्थेच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षात आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम राबविले जातील असे डॉ. के.एस. खराडे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भिकाजी चव्हाण यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन डुकरे यांनी केले तर आभार विकास चव्हाण यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!