वाटचुकलेल्या वाटसरूला सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांचा आधार

1 min read

आळेफाटा दि.२१:-खामुंडी (ता. जुन्नर) येथे एक इसम मानसिक रुग्णासारखे हावभाव करून फिरत असल्याचे येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त रवींद्र शिंगोटे यांना निदर्शनास आले. त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते परंतु म्हणतात ना संकटात अडकलेल्यांना नेहमी कुणीतरी धावून येत असत अगदी तसच झाले. शिंगोटे यांनी ग्रामपंचायत सदस्य दशरथ जगताप यांना सांगिल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांना संपर्क केला. बोडके यांनी त्यांच्या बुद्धीचतुर्याने त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता विचारला त्याने त्याचे नाव आकाश विनायक गोसावी आणि गाव सिन्नर नाशिक जवळ एवढंच सांगितले. बोडके यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती घेतली असता सदर इसम मिसिंग पोलीस हवलदार सुहास गोसावी यांच्या कडे तपास असल्याची खात्री पटल्यानंतर गोसावी यांना बोडके यांनी संपर्क करून माहिती दिली. त्यांनी त्याचे नातेवाईक घेण्यासाठी ओतूरच्या दिशेने येत असल्याचे सांगितले बोडके यांनी तो पर्यंत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमने,पोलीस हवलदार जनार्दन सापटे, संतोष भोसले,महिला पोलीस कर्मचारी ज्योती साबळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार, ज्योती शेलार यांना संपर्क साधून सर्व माहिती सांगून त्याला ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिल्या नंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून ऐन दिवाळी सना मध्ये हरलेला इसम भाऊबीजेला घरी असणार म्हणून त्याच्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बोडके यांचा जन्म दिवस असताना देखील त्यांच्या कडून माणुसकीचे दर्शन झाल्या मुळे त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!