दिवाळीत लहान मुलांची बिबट्यांपासून काळजी घ्या:- वनविभाग
1 min read
जुन्नर दि.२०:- पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असताना सध्याच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांची बिबट्यांपासून विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
शिरुर तालुक्यातील अनेक गावांसह आंबेगाव, मंचर, जुन्नर, खेड तालुक्यांत वन्यप्राणी व बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात
वावर असून काही लहान मुलांवर बिबट्यांचे हल्ले झालेले आहे. नुकतेच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक लहान मुले मामाच्या गावासह आपल्या गावी येत असतात मात्र,
नागरिकांनी बिबट प्रवण क्षेत्रात लहान मुलांना एकट्याला घराबाहेर पडून देऊ नये, बिबट प्रवण क्षेत्रात लहान मुलांना शेतात तसेच जनावरे चारायला जाताना सोबत घेऊन जाऊ नये, वाड्या, वस्त्या शेतात घर असलेल्या नागरिकांनी लहान मुलांना मोबाइल देऊन घराबाहेर खेळवत बसवू नये, लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
