महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
1 min read
नागपूर दि.२०:- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाज्योतीच्या इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे.
येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार असून या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह इतर मान्यवर व वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते.
