राजुरी येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

1 min read

राजुरी दि.१७:- येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये सकस आहार विहिर येथे 18 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच मुख्य पाणी टाकी परिसरात 18 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयासाठी 10 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्याकडे ग्रामपंचायतीने पाऊल टाकले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नविन इमारतीत लिफ्ट बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्याचे काल गावातील सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे वयस्कर नागरीक व सर्वच ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुषण जोशी व गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार यांच्या मार्गदर्शानाखाली ग्रामपंचायतीने डिजीटल युगातील सुशासनाचा पारदर्शक अध्याय म्हणुन गावाच्या विकासाचा प्रवास हा डीजीटल माध्यमातुन होण्यासाठी अधिकृत वेब साईट व सोशल मीडिया पेज त्यामध्ये फेजबुक, इंस्टाग्राम, व्हाटसअप चॅनल सुरू करून ग्रामपातळीवरील माहिती, योजना आणि उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नवे पाऊल उचलले आहे. या नाविन्यपुर्ण डिजीटल संकल्पनेचे गावातील सर्वच नागरीकांना ग्रामपंचायतचे अभिनंदन केले असुन आभार व्यक्त केले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राजुरी ग्रामपंचायत डिजिटल, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे ग्रामनेते मा.दिपकशेठ आवटे यांनी सांगितले. सौरउर्जा वापरणे ही काळाजी गरज असुन त्याच्या वापरावर भर दिला तसेच काळाच्या मागणीनुसार डिजीटल माध्यमांचा स्विकार करत त्यामाध्य मातुन ग्रामविकासाशी माहीती नागरीकांपर्यंत पारदर्शकपणे पोहचवणे सुलभ झाले असल्याचे मत युवानेते वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक आवटे, सरपंच प्रिया हाडवळे उपसरपंच माऊली शेळके, माजी सरपंच एकनाथ शिंदे, एम डी घंगाळे, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर, रंगनाथ पाटील औटी, शाकीरभाई चौगुले,गौरव घंगाळे, सुप्रिया औटी, मिना आवटे, शितल हाडवळे,निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, रुपाली औटी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके ग्राहक पंचायत प्रांतसंघटन मंत्री बाळासाहेब औटी, सोसायटीचे चेअरमन मा.कारभारी औटी, गणेश पतसंस्थेचे चेअरमन विवेक कडलाक, युवानेते वल्लभ शेळके,तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश औटी, संतोष रायकर, काशिनाथ औटी, जि.के.औटी, पांडुरंग हाडवळे, मोहन नायकवाडी, दिलीप घंगाळे, रामदास सरोदे, गंगाराम औटी, राहुल कडलाक, बंटी हाडवळे, जिलानी पटेल व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.के. औटी यांनी तर आभार सरपंच प्रिया हाडवळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी संदिप ढोरे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!