अहिनवेवाडी रस्त्यावर बिबट्याचा मोटरसायकल वर हल्ला; एक जण जखमी

1 min read

उदापूर दि.१६:- अहिल्यानगर- कल्याण महामार्गवर राज लॉन्स, अहिनवेवाडी फाट्यावरून दोघे जण मोटारसायकल वरून धावशी कडे जात होते. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये शांताराम भूतांबरे (रा. धावशी ता. जुन्नर) हे जखमी झाले. सदर जखमी व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून नारायणगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाचे वनपाल विश्वनाथ बेले, सारिका बुट्टे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!