२७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

1 min read

सुकमा दि.१६:-छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी एकूण २७ सक्रिय माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये ५० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलीचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये पीएलजीए बटालियन क्रमांक १ चे दोन कट्टर सदस्य, सीपीआय (माओवादी) विभागीय केडर, एक पक्ष कार्यकत आणि ११ संघटनात्मक सदस्यांच समावेश आहे.या सर्वांनी सुकमा जिल्ह मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमो शस्त्रे सरकारजमा केली आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्यार्च इच्छा व्यक्त केली.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये १० महिला आणि १७ पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.एकासाठी १० लाख रुपये, तिघांसाठी ८ लाख रुपये, एकासाठी ३ लाख रुपये, दोघांसाठी २ लाख रुपये आणि नऊसाठी १ लाख रुपये बक्षीस होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!