संजय राऊतांचे निकटवर्तीय विलास वाव्हळ पुण्यात उबाठाचे संपर्क प्रमुख होणार? चर्चांना उधाण
1 min read
पुणे दि.१५:- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज करणात सातत्याने काही ना काही बदल होत असतात. त्यामुळे आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात देखिल बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सचिन अहिर ऐवजी विलास वाव्हळ यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्त होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. सचिन अहिर हे पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्त आहेत. मात्र सचिन अहिर ऐवजी विलास वाव्हळ यांची पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अशी माहिती मुंबईतील खास सूत्राकडून मिळाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय विलास वाव्हळ यांचे संघटन व काम करण्याची पद्धत उत्कृष्ट असल्यामुळे त्यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड होण्याची शक्यता आहे.
विलास वाव्हळ यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यास आगामी पुणे महानगर निवडणूक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे यश मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
