कंपनीतून स्क्रॅप चोरी करणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

1 min read

अहिल्यानगर दि.१२:- अहिल्यानगर नागापूर एमआयडीसी परिसरात कंपनीतून स्क्रॅप चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी गेलेले तीन हजार २०० किलो वजनाचे स्क्रॅप हस्तगत करण्यात आले आहे.संजय साहेबराव धामोड (रा. टुनकी, ता. संग्रामपूर जि. बुलढाणा) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी येथील कंपनीतून चोरी केलेले स्क्रॅप परभणी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक मनोज मेढे, पोलीस अंमलदार राकेश खेडकर, संदीप पवार, राजू सुद्रिक, सचिन अडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे, राजेश राठोड, सूरज देशमुख यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!