कफ सिरपमध्ये DEG या घातक रसायनाचा वापर थांबवावा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्रींकडे मागणी
1 min read
पुणे दि.११:-देशभरात काही औषध कंपन्यांकडून तयार होणाऱ्या कफ सिरपमध्ये DEG (Diethylene Glycol) या अत्यंत घातक आणि विषारी औद्योगिक रसायनाचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी, आशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
DEG म्हणजे काय?
DEG (Diethylene Glycol) हे रासायनिक द्रावण सामान्यतः ऑटोमोबाईल, ब्रेक फ्लुइड, अँटिफ्रीझ, पेंट आणि प्लास्टिक उद्योगात वापरले जाते. औषध निर्मितीत याचा वापर अत्यंत धोकादायक ठरतो.सध्या तपासणीत काही कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये DEG चे प्रमाण FDA नियमांतील मर्यादेपेक्षा अनेक पटीने अधिक आढळले आहे.ज्यामुळे देशातील विविध ठिकाणी बालकांच्या मृत्यूंच्या घटना घडल्या आहेत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रमुख मागण्या१. राज्यातील सर्व औषध उत्पादक कंपन्यांच्या कफ सिरप आणि द्रव औषधांचे नमुने तपासावेत.२. DEG वापरणाऱ्या कंपन्यांची परवाने व नोंदणी तात्काळ रद्द करावीत.३. औषध नियंत्रण संचालनालय (FDA) मार्फत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवावी.
४. DEG मुळे बाधित रुग्णांना योग्य वैद्यकीय मदत आणि भरपाई द्यावी.५. औषध विक्रेत्यांना DEG-मुक्त औषधांचीच विक्री करण्याचे आदेश द्यावेत.
बाळासाहेब औटी यांचे म्हणणे
> “ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. Glycerinच्या ऐवजी DEG वापरणे हे ‘रासायनिक खून’ करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात DEG-मुक्त औषध निर्मितीसाठी शासनाने तातडीने विशेष मोहीम हाती घ्यावी,”
असे बाळासाहेब औटी, अध्यक्ष – मध्य महाराष्ट्र प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी सांगितले.
ग्राहकांना आवाहन
राज्यातील ग्राहकांनी औषधे विकत घेताना DEG-मुक्त प्रमाणपत्र असलेले औषधच वापरावे आणि संशयास्पद औषधांची माहिती स्थानिक FDA कार्यालयाला किंवा ग्राहक पंचायतीला त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.