सोन्याची चैन चोरणाऱ्या आरोपीस आळेफाटा पोलिसांकडून अटक

1 min read

आळेफाटा दि. १०- वडगाव आनंद गावच्या हद्दीत फिर्यादी शशिकांत देवकर यांची दीड तोळे वजनाची सोन्याची चैन जरांगे पाटील यांच्या रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी चोरट्याने चोरली असल्याचा गुन्हा दाखल केला. नमूद गुन्ह्याच्या तपासा दरम्यान यापूर्वी आरोपी अभिजीत शरद पवार रा.नवगन राजुरी, ता. बीड, जि. अहिल्यानगर यास अटक करण्यात येऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून ५२ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे तीन गळ्यातील चैन जप्त करण्यात आल्या होत्या.परंतु सदर गुन्ह्यातील महेंद्र किसन कुऱ्हाडे रा. आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे यांची सुमारे २ तोळे वजनाची सोन्याची चैन चोरले बाबतचा अधिकचा तपास सुरू होता. तपासा दरम्यान गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण आधारे तसेच गोपनीय बातमीदार मार्फत सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी राहुल अंबादास पवार रा.पाथर्डी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर यांनी केल्याचे निष्पन्न झाले झाल्याने सदरचा आरोपी हा बेल्हे ता.जुन्नर परिसरात येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने आरोपीचा शोध घेता. पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक हे तात्काळलेले परिसरात जाऊन सापळा रचून अत्यंत शिताफिने आरोपी राहुल आंबादास पवार यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तपासकामी अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली. पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे गुन्हाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हातील चैन चोरल्याची कबुली दिली.त्यानुसार सदर गुन्ह्यात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीकडून एकूण २ लाख २२ हजार किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक स्था.गु. शाखा पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पो.हवा.सुनील गिरी, विनोद गायकवाड,पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन अरगडे,ओमकार खुणे गणेश जगताप,प्रकाश तांगडकर, अंबादास जुंबड यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!