अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार विद्यापीठ स्थापन करावे:- आमदार खताळ

1 min read

अहिल्यानगर दि.७:- गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात साखर, दूध, बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक उन्नतीसाठी महाराष्ट्रातही असे विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे, असे आमदार खताळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री शहा यांना दिलेल्या निवेदनामधून स्पष्ट केले आहे. या प्रमुख मागणी बरोबर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणखी काही महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री अमित शहा यांना दिले. त्यामध्ये नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे नेण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!